धम्मचक्र प्रवर्तन दिन (दसरा)

धम्मचक्र प्रवर्तन दिन - दसरा  हा भारतिय बौद्धांचा मुक्तीदिन आहे. या दिनाला प्राचिन ईतिहास आहे. हा सण सम्राट अशोकांनी सुरू केला. संपुर्ण भारताचा राजा बनला. एकामागुन एक राज्य शरण आली. परंतु कलिंग देशाचा राजा चैत्र अशोक राजाला शरण आला नाही. त्यामुळे दोघात युद्ध झाले.कलिंग देशाच्या युद्धात अमानुष हत्याकांड झाले, लाखो मानसे मारली गेली व रक्ताचे पाट वाहिले, मुडद्यांचे खच पडले, या विजयाने सम्राट अशोक बेभान होऊन आनंदाने नाचत होता. 
   त्याचवेळी भंते निग्रोध चारिकेसाठी निघाले होते. त्यावेळी अशोक भंतेना आशिर्वाद द्या. मि आता सम्राट झालो. असे म्हणतो. पण भंतेजिंनी अशोकाला पापकर्माची जाणिव करून दिली. लाखो लोकांचे मुडदे पाडणारा सम्राट कसा अशु शकेल? असा सवाल केला. अनेक जिव हत्तेचे पाप तु त्रुष्णेपोटी केले आहे. यात जनहित मुळीच नाही, हे क्रुर क्रुत्य केलेले आहेस तुला सम्राट कोण म्हणेल. भंते निग्रोध यांनी तधागतांचा मैत्रि, भावनादर्श, अहिंसा तत्वाचा सदउपदेश राजाला केला. अशोकाला तो पटला व त्याने आपली तलवार म्यान केली व मि आजपासुन शस्त्र हाती घेणार नाही अशी प्रतिद्न्या केली . मि धर्मशिल होणार. मि आज खर्या अर्थाने विजयी झालो. असे अशोक भंतेना म्हणाले तो दिवस शुद्ध दशमिचा होता.
        सम्राट अशोकाने दसहरा नावाचा जाहिरनामा आपल्या राजमुद्रेसह प्रसिद्ध केला व आपल्या साम्राज्यातील लोकांना अशोक विजयदशमी दसहरा म्हणजेच दसरा सण साजरा करण्याची राजआद्न्या केली. त्यांनी बौद्घधम्माला राजश्रय दिला. अनेक लेण्या, स्तंभ उभारले. आपली मुलगी संघमित्रा व मुलगा महेंद्र यांना भिक्षु बनवुन बौद्ध धम्म प्रचार व प्रसारासाठी  श्रिलंकेत पाठविले. धम्मासाठी आपली धनदौलत खर्चि घातली. त्यांनी 84000 स्तुप बांधले. बौद्ध धम्माची संस्क्रुती जिवंत ठेवली. त्यांनी अश्विन शुद्ध दशमिला भंते उपगुप्त यांचेकडुन बौद्ध धम्माची दिक्षा घेतली. जिथे जिथे तथागत गेले तिथे त्यांनी स्तंभ ,स्तुप , विहारे बांधली. 
        धम्मदिक्षेच्या वेळी धम्मचक्र प्रवर्तनाय संकल्प म्हणुन बौद्ध धम्म आचार संहितेवर आधारलेला दसहरा नावाचा अधिक्रुत जाहीरनामा आपल्या प्रजेसाठी लोकनिती किंव्हा धर्मनिती म्हणून प्रसारित केला. हाच प्रजाधर्म, राजधर्म, व नितीधर्म समजून त्याचा आदर करावा आशी राजाद्न्या जाहीर केली. इ.स. पुर्वि 254 पासून अशोक विजयीदशमिला दसहरा म्हणजेच दसरा सण सुरू झाला व तो भारतभर साजरा केला जावु लागला. या दिवशी सम्राट अशोकाने दुसरे धम्मचक्र फिरविले.
     सम्राट अशोकाने दशहरा नावाचा जनतेच्या हिता सुखाचा जो जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यामधील दहा निती तत्वे खालील प्रमाणे,
1. हिंसाचार, धार्मिक स्थळी व कार्यक्रमात पशु हत्या करणार नाही.
2. चोरी, फसवणूक, लुबाडणूक इ. न करणे.
3. प्ररस्त्रिगमन न करणे, व्यभिचार न करणे.
4. खोटे न बोलणे, गैरव्यवहार न करणे. निंदा, चहाडी न करणे.
5. सार्वजनिक व पावित्र्य स्थळी मद्यपान न करणे.
6.  नास्तिकपणा म्हणजे सत्कार्य व माणूसकीचा तिटकारा सोडून देणे.
7. माणुस गुणांनी श्रेष्ठ मानावा. त्याच्या जातीने नव्हे.
8. वैर सोडून दिल्यानेच वैर शांत होते हे विसरू नये.
9. धर्मगुरूंनी सांगितलेले बहुजन हिताय , बहुजन सुखाय  व सदाचार हे आपले आचरण विसरू नये.
10. निती नियमांचे पालन करणार्यास अम्रुताचा लाभ होईल, नाहीतर म्रुत्युगाठ हे विसरू नये.
            असा हा दहा कलमांचा जाहिरनामा होता. याला दशहरा म्हणतात. त्याचाच दसरा हा शब्द रुढ झाला. सम्राट अशोकाच्या धम्म कार्याला मान देऊन व या दिवसाचे प्रतिक म्हणून डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्प्रुष्य ,दलित समाजाला जिर्ण रूढी , जातियता, अंधश्रद्धेतुन मुक्त करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी दसरा हा दिवस ठरविला आणि 14 आँक्टोबर 1956 साली हिंदू धर्मातिल रूढीविरुद्ध, अमानुष, मानसिक गुलामगिरीतुन मुक्त केले. न भुतो न भविष्यती अशी धम्मक्रांती केली. एकाच वेळेला दहालाख लोकांना दिक्षा देऊन.
       सम्राट अशोकाने ज्या दिवशी धम्मचक्र फिरविले होते त्याच शुभदिनी त्या धम्मचक्राला बाबासाहेबांनी गती दिली. बौद्ध जनतेच्या द्रुष्टीने ही अनन्य साधारण , कधिही न विसरण्यासारखी घटना आहे. म्हणून दरवर्षि अश्विन शुद्ध दशमिला हा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. हा सण बाबासाहेबांच्या जिवनातील शेवटची क्रांती आहे. या क्रांतीला जगात तोड नाही. म्हणुन अशोक विजयीदशमी- दसरा हा बौद्धांचा महान आनंदाचा सण आहे . मंगल दिन आहे.
           त्या दिवशी विहारात, सार्वजनिक ठिकाणी जमुन वंदना, सुत्रपठन करावे, सभा संमेलने, घम्म प्रवचने आयोजित करून या दिवसाबद्दलची माहीती सांगावी. सर्वानी आनंदाने एकमेकाचे स्वागत करावे.

          

      🙏🏻 जयभिम🙏🏻

Comments

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन, अर्थात विद्यार्थी दिनाची कर्मकहाणी

समाज प्रबोधनाचे चालते बोलते विदयापिठसमाज सुधारक डेबूजी झिंगराजी जानोरकर म्हणजेच गाडगे बाबा..

काळाराम मंदिर सत्याग्रह आणि बाबासाहेबांचे नाशिक सोबतचे नाते