बाबासाहेब

(1.) बाबासाहेब
यांनी बुद्ध आणि त्याचा धम्म
हा ग्रंथाची प्रस्थावना लिहिली आणि त्याच
रात्री बाबासाहेबांचा संशयास्पद
दिल्ही मध्ये मृत्यू
झाला हि बातमी रात्री रेडिओ वरून
साऱ्या भारतात पसरली सारा समाज रडू
लागला जनता धाय
मोकलून रडतy
होती बाबासाहेबांना त्यांचा अंत्य
विधी हा मुंबईत होणार
होता आणि बाबासाहेबांचे प्रेत हे दिल्लीत
पडून आहे एक तास झाला दोन तास झाले तीन
तास झाले चार तास झाले बाबासाहेबांचे प्रेत
तशेच पडून आहे
एवढा उशिर
का झाला त्यांच्या प्रेताला आणायला तर
नंतर समजल कि बाबासाहेबांचे प्रेत
ज्या विमानाने मुंबईत नेणार आहेत
त्या विमानांच भाड कोण भरणार याच्यावरून
वाद चालू होता सकाळी चार वाजता हा वाद
संपला आणि मग
बाबासाहेबांचे प्रेत निघाले
दिल्ली वरून सकाळी बाबासाहेबांचे पार्थिव
सांताक्रूझ विमानतळावर आणले
आणि त्या लोकांना आश्चर्याचा धक्का बसला तो असा कि सांताक्रूझ
विमानतळ लोकांच्या गर्दीने भरले होते
जनता रस्त्याच्या दुतर्फा उभी राहून रडत
होती काय होते
नात
त्यांच्याशी बाबासाहेब हे काही रक्ताचे
नाते नव्हते बाबासाहेबांचे प्रेत राजगृहात
आणले गेले करोडोंचा जनसागर राजागृहाकडे
आला होता हिंदूंच्या ब्राह्मणांना सुद्धा आश्चर्य
वाटले बाबासाहेब
आणि त्यांच्या अंत्ययात्रेला इतका जनसागर
डोळे विस्परले त्यांचे अगदी समाज
सारी जनता बाबासाहेबांचे शेवटचे दर्शन
घ्यायला आली होती आणि बाबासाहेबांची अंत्ययात्रा निघाली जगाच्या इतिहासातील
सर्वात मोठी अंत्ययात्रा करोडो जनसागर
डोळे पुसत निघालाय मुंबईतील सारी रहदारी बंद
पडली दुकाने
बंद
झाली होती आणि तब्बल
गर्दी जमली होती मुंबईच्या इतिहासातील
एकमेव
अंतयात्रा ना भूतो ना भविष्याती अशी अंतयात्रा चालालि आहे
सारे जन दुःखाच्या सागरात बुडाले आहेत
बाबासाहेब यांचे
पार्थिव त्या दादर येथील
हिंदू स्मशान भूमीत आणले लोकांचे ते
डोळ्यातील अश्रू काही थांबत नव्हते त्याचे
वेळी बाबासाहेब
यांच्या प्रेतासोबात
आलेले शंकर आनंद शास्त्री यांनी सांगितले
कि नाही बाबासाहेब यांच्यासोबत घातपात
झाला हे बाबासाहेबांच्या शवाचे शवविच्छेदन
करा आणि बी सी कांबळे
यांनी हि शास्त्री यांच्या मताला दुजोरा दिला कि नाही बाबासाहेब
यांच्यावर विषप्रयोग झालाय पाहिलं
शवविच्छेदन करा पण त्या मध्ये उपस्थित
असणाऱ्या हिरानंदानी यांनी सांगितले
बाबासाहेबांचे शवविच्छेदन केल तर जगभरात
दंगली होतील आणि दंगलीच कारण पुढे केल गेल
नंतर बाबासाहेब
यांच्या प्रेताला चंदनाच्या चितेवर ठेवलं पण
तिथे जमलेल्या जनतेचे अश्रू बोलत होते
थांबा थांबा बाबासाहेब
यांच्या चितेला अग्नी देवू नका थांबा आज
अश्रू हि बोलत होते तिथे जमलेला जनसागर
म्हणत आहे थांबा बाबासाहेब १६ तारखेला येणार
होते
आणि आम्हाला धम्माची दीक्षा देणार होते
पण आज बाबासाहेब ६ तारखेला आलेत
आता आम्ही यांना जावू देणार
नाही केवढी भूक धम्माची बाबासाहेब
यांच्या चितेला साक्षी ठेवून १६ लाख
लोकांनी धम्माची दीक्षा घेतली अरे ते
बाबासाहेब जिवंतपणी धम्माची दीक्षा तर
देत होते पण मेल्यावर हि धम्माची दीक्षा देत
आहेत जगातील असा पहिला महामानव आहे
ज्याने मेल्यावर हि आपल्या अनुयायांना धम्म
दिला बाबासाहेबांच्या चितेला समोर ठेवून
दीक्षा सोहळा काय देखावा होता डोळ्यात
अश्रूंचा पूर वाहत आहे आणि लोक धम्माकडे
जात आहेत हि धम्माची भूक आहे धम्म हवा आहे
आम्हाला बाबासाहेबांच्या पावूलावर पाय
ठेवून ह्या लोकांनी धम्म घेतला बाबासाहेब
आयुष्यभर समाजाला जागा करण्यासाठी झटले
उभे
आयुष्य खर्ची घातले
त्या बाबासाहेबांना आम्ही काय दिल
बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी पोलिस
बंदोबस्त ठेवून दारूची दुकाने बंद
ठेवावी लागता केवढी मोठी शोकांतिका आहे
आमच्या लोकांची आम्ही काय केल
बाबासाहेबांसाठी बाबासाहेबांच्या
विचारांचे तुकडे तुकडे केले अखेर आज
परिस्थिती तशी आहे बाबासाहेबांचे विचार
सोडून लोकांनी रूढी परंपरा जपत आहेत
बाबासाहेबांचा सुद्धा देव केल जाणून बुजून देव
केल कारण
त्यांना माहित आहे
जेव्हा महामानव देव होतो तेव्हा त्याचे
विचार संपतात आणि त्याचे विचार संपले
कि महामानव संपला हि वास्तविकता आहे
आमच्या समाजाने ती स्वीकारली पाहिजे
बाबासाहेबांचा संदेश समाजाला पाहिजे बावीस
प्रतिज्ञा पंचशील याचे पालन केले
पाहिजे बाबासाहेब तर म्हणत जो पंचशील
पालन करतो त्याच्यावर कायद्याचा अंमल
राहत नाही कारण तो कोणता गुन्हाच
त्याच्या हातून होत नाही बाबासाहेब हे
पंचाशिलाचे पालन करत होते म्हणून आयुष्यात
कधी त्यांच्यावर कायद्याची कारवाई
झाली नाही हे सत्य आहे बहुजन समाजाचे उद्धार
करत करत
बाबासाहेब
जनतेला सांगत गेले
आता तुम्ही हि सुधारा नाही तर परत
कोणता बाबा बुवा ह्यांच्या नदी जावून परत
गुलामीत जाल विचार
करा मित्रानो परिवर्तन होणे गरजेचे आह.
(2.)बाबा तुम्ही कशाला भारतात लोकशाही पेरली.?
तुझ्याच लेकरांनी समाजाची सगळी वाट लावली.
आज आम्ही खुशाल करतो श्रावण ज्योतिबा खंडोबा
दारात घालतो सत्यनारायणचा मेळा
तुझ्या नावाची मात्र १४ एप्रिलपुरती आठवण ठेवली
बुद्धिमत्ताच आमची देवाऱ्यात असते सांडलेली
तुझ्याच लेकरांनी बाबा समाजाची सगळी वाट लावली.
आज साहेबावानी थाट आमचा
राजाराणीवानी ऐशोआरामाचा संसार आमचा
तरीही १४ एप्रिलला मोजकीच वर्गणी आमच्या हातून सुटली
पावती मात्र भांडून मागितली
तुझ्याच लेकरांनी बाबा समाजाची सगळी वाट लावली
जातो आम्ही शिरडीला
जातो आज बालाजीलानागांच्या माहेराला
अर्थात दिक्षाभूमीला जायला वेळ नाही आम्हाला.
तुझ्याच लेकरांनी बाबा समाजाची सगळी वाट लावली.
फिरतो आज गाडीत
राहतो तोऱ्यात पाचमजली माडीत
बायको आमची नववारी साडीत
पैशाच्या मोहात मात्र बुद्धी आमची नासली
तुझ्याच लेकरांनी बाबा समाजाची सगळी वाट लावली.
सवलती घ्यायला आमची पहिली हजेरी
तुझे कार्य करायला दोन पाऊले माघारी
दारु पार्टीला मात्र एकमेकांच्या घरी
बाबा तुझ्या विश्वासाची होळी आम्ही केली
तुझ्याच लेकरांनी बाबा समाजाची सगळी वाट लावली.
बुद्धविहाराला दाखवून पाठ
मंदिराकडे वळते आमची लाथ.
त्रिसरण पंचशील कुणाला माहीत
देवांच्या प्रार्थना मुखी सतराशे साठ.
बळी देताना आयबहीण नाही पाहिली
तुझ्याच लेकरांनी बाबा समाजाची सगळी वाट लावली.
जय भिम घालताना जीभ दाताखाली चावते
रामराम बोलताना मात्र बत्तीशी आमची दिसते
तु मिळवून दिलेल्या फुकटच्या आरक्षणाची जाण नाही राहिली
तुझ्याच लेकरांनी बाबा समाजाची सगळी वाट लावली.
अहो संविधानात काय असते आम्हाला नाय माहीत
आमच्या घरी रामायण महाभारत थोतांड पुराणांसहीतबाबा तुझ्या विचारांची आम्हीच धिंड काढली
तुझ्याच लेकरांनी बाबा समाजाची सगळी वाट लावली.
तुझ्या लोकशाहीने सगळे मनाचे राजे झाले
हे फार चांगले झाले
परंतू तुलाच सगळे विसरले
बाबा तुझे कार्य करता करता हे मनुवाद्यांच्याच
ताटाखालची मांजर झाली
तुझ्याच लेकरांनी समाजाची सगळी वाट लावली.
एवढचं सांगतो बाबा तुझी शिकवण ज्याला कळाली
तोच चढवेल सर्वांना धम्माची पायरी
आणि भारत सारा बौद्धमय करुन पाऊलेही वळवतील गल्ली ते दिल्ली.
तरीही तुला सांगावेसे वाटते कि बाबा तु कशाला भारतात लोकशाही पेरली.
तुझ्याच लेकरांनी समाजाची सगळी
वाट लावली.
तुझ्याच लेकरांनी समाजाची सगळी वाट लावली._
जय भिम
(3.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जिवन पट - 
1. 14 एप्रिल 1891 - महू, मध्यप्रदेश येथे सैनिक छावणीत जन्म.
2. 1907 - रमाबाई वलंगर यांच्याशी लग्न झाले.
3. 1907 - बाबासाहेब मॅट्रिकची परीक्षा पास.
4. 1910 - इंटरची परिक्षा उतीर्ण.
5. 1912 - बी. ए. परिक्षा उतीर्ण.
6. 1912 - पुत्र यशवंतराव यांचा जन्म.
7. 2 फेब्रुवारी 1913 - वडील सुभेदार रामजी यांचे निधन.
8. 1 जुन 1913 - सयाजीराव गाडकवाड यांनी विदेशात अध्यनासाठी शिष्यवृत्ती जाहिर केली.
9. 1913 - उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला प्रयान.
10. 1915 - ऍन्शंट इंडियन कॉमर्स या प्रबंधावर एम. ए. ची पदवी बहाल.
11. 1916 - नॅशनल डिविडंट ऑफ इंडिया ए हिस्टोरिक अँन्ड अनलिकटिकल स्टडी प्रबंध कोलंबिया विद्यापीठाद्वारे स्विकृत.
12. 1916 - कास्ट इन इंडिया, देअर मॅकेनिझम जेनिसिस अँन्ड डेव्हलपमेँट या निबंधाचे वाचन.
13. 1916 - पी. एच. डी. ची पदवी बहाल.
14. 1917 - मुंबई ला परत आले.
15. 11 नोव्हेँबर 1918 - सिडनहेम कॉलेजमध्ये अर्थशास्राची प्रोफेसर म्हणुण नियुक्ती.
16. 31 जानेवारी 1920 - राजर्षी शाहु महाराज यांच्या साहाय्याने मुकनायक पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित.
17. 1921 - एम. एस. सी पदवी संपादन.
18. 1922 - बॅरिस्टरची परिक्षा पास.
19. 1923 - डॉ. ऑफ फिलॉसॉफी पदवी मिळाली.
20. 1923 - डॉ. ऑफ सायन्सची पदवी बहाल.
21. 1923 - दि प्रॉब्लेम ऑफ रुपी ग्रंथ प्रकाशित.
22. 1923 - बॅरिस्टरीस सुरुवात.
23. 1924 - अस्पृश्य समाजाची परिषद.
24. 20 जुलै 1924 - बहिष्कृत हित कारणी सभेची स्थापना, मुंबई.
25. 1925 - असृश्यांसाठी वसतीगृह स्थापन.
26. जुलै 1926 - राजरत्न या मुलाचे निधन.
27. 1927 - कुलाबा जिल्हा महाड बहिष्कृत परिषद.
28. 3 एप्रिल 1927 - बहिष्कृत भारत या पाक्षिकाचे प्रकाशन.
29. 1927 - मुंबई विधिमंडळात सदस्य म्हणुन निवड.
30. 4 सप्टेँबर 1927 - समाज समता संघ याची स्थापना.
31. 1927 - बंधु बाळाराम आंबेडकरांचे निधन.
32. 1927 - अस्पृश्य समाजातील शिक्षकांतर्फे सत्कार.
33. 13 नोव्हेँबर 1927 - अमरावती येथे अंबादेवी मंदिर सत्यागृह.
34. 25 डिसेँबर 1927 - महाडचा सत्यागृह, मनुस्मृती दहन.
35. 1928 - महार वतने सुधारणा विधेयक विधी मंडळासमोर मांडले.
36. 1928 - मुंबई येथे सरकारी विधी महाविद्यालयात प्राध्यपक.
37. 1928 - मुंबई प्रांतिक समितीवर निवड.
38. 1928 - सायमन कमिशन पुढे साक्ष.
39. 29 जुन 1928 - समता पाक्षिकाचा आरंभ.
40. 1929 - दामोदर सभागृहात गिरणी कामगारांच्या सभेत भाषण.
41. 1929 - टांग्यातुन फेकले गेल्यामुळे पायाला दुखापत.
42. 1929 - अस्पृश्यांसाठी 33 टक्के आरक्षण देण्याबाबत मुंबई विधिमंडात भाषण.
43. 3 मार्च 1930 - काळाराम मंदिर नाशिक सत्यागृह प्रारंभ.
44. नोव्हेंबर 1930 - गोलमेज परिक्षेत अस्पृश्यांची बाजु ठामपणे मांडली.
45. 24 नोव्हेँबर 1930 - जनता साप्ताहिकाचा आरंभ.
46. 26 नोव्हेँबर 1931 - गंधी व बाबासाहेब व पंचम जार्ज यांची भेट.
47. अल्पसंख्याकांच्या प्रश्नांबाबत गांधीजीच्या धोरणाला गोलमेज परिषदेत विरोध.
48. 1932 - अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देण्यासंबंधी परिषद.
49. 1933 - संयुक्त समितीच्या कामासाठी लंडनला प्रयान.
50. 27 मे 1935 - पत्नी रमाबाई यांचे निधन.
51) 1935 - मुंबई विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावर नियुक्ती.
52) 13 ऑक्टोँबर 1935 - येवला. हिँदु म्हणुण जन्माला आलो, पण हिँदु म्हणुण मरणार नाही - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची येवला येथे धर्माँतराची घोषणा.
53) 15 ऑगस्ट 1936 - स्वतंत्र मजुर पक्षाची स्थापना.
54) 1936 - जाती प्रथेचे उन्मुलन भाषन प्रकाशित.
55) 1936 - मुक्ती कोण येथे विख्यात भाषण.
56) 1936 - प्रकृती स्वास्थासाठी युरोपला रवाना.
57) कोकणातील खोती नष्ट करण्यासाठी मुंबई विधिमंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बिल मांडले.
58) 17 फेब्रुवारी 1937 - मुंबई ऍसेँब्ली निवडणुक विजयी.
59) 1938 - पंढरपुर मातंग परिषदेतर्फे मानपत्र.
60) 1938 - मनमाड येथे अस्पृश्य रेल्वे कामगार परिषद.
61) 1938 - विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाचा राजीनामा.
62) 1938 - औद्योगिक कलहाचे विधेयक मुंबई विधिमंडळात मांडले.
63) 1938 - औरंगाबाद येथे अस्पृश्य सभेचे अध्यक्ष.
64) 1940 - मुंबई येथे सुभाष चंद्र बोस यांच्या सोबत भेट.
65) 1940 - थॉटस अँन्ड पाकिस्तान या ग्रंथाचे प्रकाशन.
66) 19 जुलै 1942 - भारतीय दलित वर्ग परिषद, नागपुर येथे हजर.
67) 1942 - मजुर मंत्री म्हणुन निवड.
68) 1942 - अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशनी स्थापना.
69) पुणे येथे रानडे जन्म शताब्धी कार्यक्रमात सर्वोतम भाषण.
70) 1945 - काँग्रेस आणि गांधीजीनी अस्पृश्यांप्रती काय केले ग्रंथ प्रकाशित.
71) 1946 - शुद्र पुर्वी कोण होते हा ग्रंथ प्रकाशित.

72) 1946 - सोलापुर, अहमदाबाद नगर पालि

Comments

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन, अर्थात विद्यार्थी दिनाची कर्मकहाणी

समाज प्रबोधनाचे चालते बोलते विदयापिठसमाज सुधारक डेबूजी झिंगराजी जानोरकर म्हणजेच गाडगे बाबा..

काळाराम मंदिर सत्याग्रह आणि बाबासाहेबांचे नाशिक सोबतचे नाते