त्यांच्या महापरिनिर्वान दिना निमित्त विनम्र अभिवादन. ....... गाडगे महाराज (फेब्रुवारी २३, १८७६ - २० डिसेंबर इ.स. १९५६) हे ईश्वर कशात आहे नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. गाडगे महाराज गाडगे बाबा टोपणनाव: डेबूजी झिंगराजी जानोरकर जन्म: फेब्रुवारी २३, १८७६ शेणगाव अंजनगाव, कोल्हट सुर्जी तालुका, अमरावती जिल्हा, महाराष्ट्र मृत्यू: २० डिंसेंबर १९५६ वलगांव (अमरावती) "तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद...
Comments
Post a Comment