काळाराम मंदिर सत्याग्रह आणि बाबासाहेबांचे नाशिक सोबतचे नाते
काळाराम मंदिराचा सत्याग्रह ही एक क्रांतिकारक घटना होती. हि एक मानव मुक्तीची लढाई होती. हि लढाई होती अस्मितेची हि लढाई होती. स्वाभिमानाची मानची हक्क मिळविण्यासाठी अस्पृश्य समाज 2 मार्च 1930 रेाजी स्वाभिमानाने ताठ मानेने अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी दंड थोपटुन धर्मसंकटात उभा राहिला. नाशिकच्या या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्राहाने ज्वलंत इतिहासाचे पान उघडले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर दादासाहेब गायकवाड , रावबा ठेगे, अमृतरावजी रणखांबे, तुळशीराम संभाजी काळे, शिवराम पाला मारु, र्पांडुरंग जीबाजी सबनीस, गणपत सज्जन कानडे, सावळेराम बापुजी दाणी, संभाजी रेाकडे, भवानराव उमाजी बागुल, रंगनाथ शकर भालेराव, लिंबाजी भिवाजी भालेराव , नाना रावबा चंद्रमोरे, महन्त ठाकुरदास बर्वे इत्यादी कार्यकर्त्याशी केशव नारायण देव यांच्या अध्यक्षतेखाली विहीतगाव देवलाली येथे प्रथम 29 -12-1929 रोजी विहीतगावच्या चावडीत झालेल्या बैठकीमध्ये मंदिर प्रवेशाची घोषणा केली. न्यायालयीन कामानिमित्त डॉ. आंबेडकर 1926 मध्ये नाशिकला आले होते. मुक्कामासाठी ते शाहु बोर्डिग...