महाराष्ट्र शासनाने २७ ऑक्टोबर २०१७ रोजी खास परिपत्रक जारी करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन ७ नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे. खरे तर हा एक क्रांतिकारी निर्णय असून याचे अत्यंत दूरगामी परिणाम संपूर्ण भारताच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रावर होणार आहेत. . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ हे १८९४ मध्ये सैन्याच्या नोकरीतून निवृत्त झाले. त्यावेळी ते “कॅम्प दापोली” येथे राहत होते. त्यांनी १८९६ मध्ये दापोली सोडले आणि सातारा येथे गेले. भीमराव त्यावेळी लहान असल्याने त्यांना शाळेत प्रवेश मिळू शकला नव्हता. त्यामुळे त्यांचे मूलभूत शिक्षण वडिलांच्या मार्गदर्शनाखाली घरीच झाले. शेवटी ७ नोव्हेंबर १९०७ मध्ये त्यांचे नाव साताऱ्याच्या जुना राजवाडा येथील सातारा हायस्कूलमध्ये (अर्थात आजच्या प्रतापसिंग हायस्कूल मध्ये) टाकण्यात आले. त्यांना इयत्ता पहिलीच्या इंग्रजी वर्गात प्रवेश देण्यात आला. इसवी सन १९०० ते १९०४ ही बाबासाहेबांच्या बालपणीची चार वर्षे या शाळेत गेली. . छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) यांचे नातू छत्...